LIVE UPDATES

प्रमोद काळसेकर यांना केंद्र सरकारचा सर्वोच्च बहुमान!

गृह मंत्रालयाकडून दिला जाणारा प्रतिष्ठित 'केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट सेवा पदक' जाहीर
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 14, 2026 21:59 PM
views 89  views

सिंधुदुर्ग : पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठा, शौर्य आणि गुन्ह्यांच्या तपासातील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर यांना केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून दिला जाणारे प्रतिष्ठित 'केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट सेवा पदक' जाहीर झाले आहे. त्यांच्या या यशामुळे पोलीस वर्तुळातून आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर यांनी आपल्या २२ वर्षांच्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवाकाळात केवळ गुन्हेगारांच्या मुसक्याच आवळल्या नाहीत, तर स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता वेगवेगळ्या गंभीर प्रसंगांत ५ निरपराध लोकांचे प्राण वाचवून खाकी वर्दीची प्रतिष्ठा वाढवली आहे. आपल्या सेवाकाळात काळसेकर यांनी अनेक अतिसंवेदनशील आणि किचकट गुन्ह्यांचे धागेधोरे शोधून काढले आहेत.

बेकायदेशीर शस्त्रांची खरेदी-विक्री करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश, तरुणाईला जाळ्यात ओढणाऱ्या ड्रग्ज माफियांचे कंबरडे मोडत कोट्यवधी रुपयांचा साठा जप्त. अनेक अंधाऱ्या आणि गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल. प्रमोद काळसेकर यांची कामगिरी नेहमीच अव्वल दर्जाची राहिली आहे. यापूर्वी त्यांना 'माननीय पोलीस महासंचालक (महाराष्ट्र राज्य) सन्मान पदक' आणि 'केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले आहे. आता पुन्हा एकदा केंद्रीय सेवा पदक जाहीर झाल्याने पोलीस वर्तुळातून आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.