
सिंधुदुर्गनगरी : पोलिस दलात दीर्घकाळ निष्कलंक व उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उत्कृष्ट सेवेसाठी पदकांसाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये २५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक निष्कलंक सेवा बजावणाऱ्या सहा अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘अति-उत्कृष्ट सेवा पदक’, तर १५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक निष्कलंक सेवा असलेल्या सात अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहे.
अति-उत्कृष्ट सेवा पदकासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेश रमेश भागवत (सावंतवाडी), रा.पो.नि रामदास नागेशा पालशेतकर (पोलिस मुख्यालय), श्रेणी पोलिस निरीक्षक संजय पुंडलिक साटम (बॉम्ब शोधक व नाशक पथक), श्रेणी पोलिस निरीक्षक वासुदेव विश्वनाथ वरवडेकर (पोलिस मुख्यालय), स.पो.फो भालचंद्र मोहन दामोळकर (बॉम्ब शोधक व नाशक पथक) आणि सपोफो डॉमिनिक संताना डिसोजा (स्थागुशा) यांची निवड झाली आहे.
तर उत्कृष्ट सेवा पदकासाठी डॉ. मोहन मुरलीधर दहिकर (पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग), पो.नि प्रविण अशोक कोळे (स्थागुशा), पो.हवा राकेश रवींद्र कडुलकर (कणकवली पोलिस ठाणे), पो.हवा प्रमोद बाळकृष्ण काळसेकर (कुडाळ पोलिस ठाणे), पो.हवा किरण कृष्णा देसाई (स्थागुशा), पो.हवा बरस्त्याव पेद्रू डिसोजा (स्थागुशा) आणि पो.हवा राहुल शिवाजी काळे (बॉम्ब शोधक व नाशक पथक) यांचा समावेश आहे.
दीर्घकाळ प्रामाणिकपणे, शिस्तबद्ध पद्धतीने आणि कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावणाऱ्या या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना मिळालेला हा सन्मान पोलिस दलासाठी गौरवास्पद मानला जात आहे. या पदकांमुळे जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कर्तव्य बजावण्याची नवी प्रेरणा निर्माण होणार आहे.










