LIVE UPDATES

कोलगाव येथील दुचाकी अपघातातील युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

अपघातात युवती जागीच ठार : गाडीच्या दर्शनी भागाच मोठे नुकसान
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 25, 2026 11:40 AM
views 995  views

सावंतवाडी : कोलगाव मियासाब दर्ग्याजवळ दुचाकी आणि चारचाकीत भीषण अपघात झाला. यात एक युवती जागीच ठार झाली. तर गंभीर जखमी असलेला युवक देखील उपचारा दरम्यान मृत पावला आहे. समोरील स्वीफ्ट चालकाबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांकडून त्याबाबत चौकशी केली जात आहे. 

कोलगाव येथील मियासाब समाधीजवळ हा अपघात झाला. दुचाकी ( जीए. ०३ एबी. ७५०१) व चारचाकी ( एम. एच. ०७ एजी ७८०१) यांच्यात हा अपघात झाला. चारचाकी सावंतवाडीच्या दिशेने तर दुचाकी कुडाळच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. य अपघातात आयुषी देसाई  ही जागीच ठार झाली. तर कार्तिक परब हा गंभीर जखमी होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील युवक व युवती रस्त्यावर फेकले गेले. यात दोघे गंभीर जखमी झाले. तर समोरून येणारी स्वीफ्ट कार शेजारील गटारात गेली. गाडीच्या दर्शनी भागाच मोठं नुकसान झालं. जखमींना अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. महेश बांदेकर, कृष्णा धुळपनावर, लादू रायका यांनी जखमींना रूग्णालयात हलवले. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी जखमींवर उपचार केले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून सहाय्यक पोलिस फौजदार श्री. राऊत, पोलिस हवालदार सुरेश पाटील, पोलिस हवालदार धोत्रे, पोलिस कॉन्स्टेबल पवन परब पुढील तपास करत आहेत.