
दोडामार्ग : तिलारी नदीच्या घोटगेवाडी पुलावरून अज्ञात व्यक्ती वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडला // कोनाळ कट्टा येथील उपसरपंच रत्नकांत करपे यांनी दोन व्यक्ती वाहत जात असल्याचा व्हिडिओ पाठवला आहे. // तिलारी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडले असल्याने घोटगेवाडी येथील पूल पाण्याखाली गेला आहे.// याच पाण्याच्या प्रवाहात दोन अज्ञात व्यक्ती वाहून गेल्याचे समोर आले आहे// मोठ्या प्रमाणात नदीला पाणी असल्याने मदत कार्य होऊ शकले नसल्याचे करपे म्हणाले.// मात्र त्यांनी नदीकाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने शोधकार्य हाती घेतले.// मात्र ते दोन्ही व्यक्ती आढळून आले नाहीत.// दरम्यान, यामध्ये त्यात एक लहान मुलगा असल्याचीही माहिती समोर येत आहे.











