
कुडाळ : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या वतीने कुडाळ येथील सिद्धिविनायक हॉल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण ७६ जणांनी नोंदणी केली, तर ६३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
या शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक अब्बास आदम खुल्ली यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी उद्योजक मुश्ताक शेख, विद्याधर कुडाळकर, हाफीज नाझीम आणि 'साबु सिद्दीक कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग'च्या १९८६ बॅचचे माजी विद्यार्थी उपस्थित होते. शिबिरास कुडाळ नगरपंचायतचे गटनेते व नगरसेवक विलास कुडाळकर, नगरसेवक मंदार शिरसाट, अभी गावडे, उदय मांजरेकर, सुनील बांदेकर, माजी नगराध्यक्ष अफरीन करोल, तसेच अमित राणे, राजवीर पाटील, राजू गवंडे, एजाज नाईक, हाफिस शेख, मोबीन दोस्ती, शेखर गवंडे आणि इम्रान खान इत्यादी मान्यवरांनी भेट देऊन आयोजकांचे व रक्तदात्यांचे कौतुक केले.
सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन गेली सहा वर्षे रक्तदान चळवळ व्यापक करण्यासाठी कार्यरत आहे. कोरोना काळात गरजू रुग्णांना मदत करण्यासोबतच, फाउंडेशनतर्फे पेशंट बेड, व्हीलचेअर व वैद्यकीय साहित्य पुरवले जाते. “रक्तदान हीच जीवनदानाची सेवा” या भावनेतून तरुणांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या शिबिरात शहाजी पाटील, अब्बास सय्यद, सादतहुसेन नाईक, रेहान आवटे, अल्ताफ काझी, निसार मणीयार, बशीरुद्दीन शेख, तोहित शेख, विक्रम जाधव, सादिक मेमन, सुकृता कराळकर, गोविंद कोरगावकर, सुलताना नाईक, अफरीन करोल, प्रसाद सावंत, संकेत कुडाळकर यांच्यासह ६३ जणांनी रक्तदान केले. मान्यवरांनी फाउंडेशनच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.











