LIVE UPDATES

पर्यावरण दिनानिमित्त तळवडेत वृक्षारोपण

Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 05, 2026 20:55 PM
views 91  views

देवगड : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्रामपंचायत तळवडे व तळेबाजार तलावानजीक वृक्षारोपण करून पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण यासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन तळवडे प्रशासक गोपाळ रूमडे यांनी उपस्थितांना केले.

या उपक्रमात ग्रामपंचायत अधिकारी एन .पी. खिल्लारे , प्रशासक तळवडे गोपाळ रूमडे, प्रशासकीय समिती सदस्य , ग्रा.प. कर्मचारी, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, तसेच ग्रामस्थांनी सहभाग घेतला. उपस्थितांनी वृक्षारोपणासह पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेतली.