
सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यातील आडाळी औद्योगिक क्षेत्रात खनिज उत्खनन वाहतूक प्रकरण गाजत असतानाच उद्योगमंत्र्यांनी दोन दिवसांत कारवाईच आश्वासन देऊन चार दिवस उलटलेले असताना आता महसूल विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता कुंब्रल बागवाडी येथे माती उत्खनन होत आहे. गावात रस्त्याच्या कडेला माती भराव टाकण्यासाठी बेकायदेशीर शेकडो ब्रास माती उत्खनन करून वाहतूक केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याबाबत दोडामार्ग महसूल विभाग कोणती कारवाई करत ? याकडे लक्ष लागून राहीले आहे.
दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात अवैध खनिज माती उत्खनन केले जात असल्याचे बोलले जात आहे. दोडामार्ग महसूल विभागाचा धाक नसल्याने या घटना वाढत चालल्याच बोलल जात आहे. यातून शासनाचा लाखो रुपये महसूल बुडवला जात आहे. आडाळी औद्योगिक क्षेत्रात तसेच तळकट भागात माती उत्खनन खनिज उत्खनन घटना समोर आल्या आहेत. असे असताना गेले काही दिवस कुंब्रल गावात अवैध माती उत्खनन करून ती रस्त्याच्या कडेला भराव टाकण्यासाठी वाहतूक केली जात आहे. कुंब्रल गावात अवैध माती उत्खनन करून वाहतूक केली हे समजताच मंडळ अधिकारी, महसूल कर्मचारी यांनी गुरुवारी घटनास्थळी जावून मोजमाप घेतले आहे. त्यामुळे याबाबत आता महसूल प्रशासन काय दंड करत ? याकडे लक्ष लागून आहे.
दुसरीकडे आडाळी मायनिंग सदृश माती उत्खनन विषयात उद्योग मंत्र्यांनी दोन दिवसांत कारवाईच आश्वासन देऊन आता चार दिवस उलटले. तरीही कारवाईची हालचाल दिसत नाही. त्यामुळे नक्की या प्रकारांना खतपाणी कोण घालतंय ? या पुष्पांच्या मागची अदृश्य शक्ती कोण ? असाही सवाल आता उपस्थित होत आहे.











