
दोडामार्ग : दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोला वझरे येथील अवघड वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात झाल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. सुदैवाने चालक व वाहक सुखरूप असून टेम्पोचे मात्र नुकसान झाले आहे.
कोल्हापूर येथील एक टेम्पो गोवा येथे दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीसाठी आला होता. विक्री करून तो शुक्रवारी पहाटेच्या सुमारास परतीच्या प्रवासाला निघाला असता वझरे येथील चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. परिणामी टेम्पो रस्ता सोडून घळणीत गेला. सुदैवाने कोणीही जखमी झाले नसून टेम्पोच्या दर्शनी भागाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.











