LIVE UPDATES

मालवण शहरालगत घराजवळ बिबट्याचा वावर

भीतीचे वातावरण
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 05, 2026 16:00 PM
views 319  views

मालवण : मालवण शहरालगत असलेल्या कोळंब भटवाडी येथे बिबट्याचा वावर आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पर्यटकांनी हा बिबट्या पाहिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले असून ग्रामस्थांनी वणविभागाशी संपर्क साधला आहे. 


मालवण शहरालगत कोळंब भटवाडी येथील आबा साळकर यांच्या घराजवळ बिबट्याचा वावर पाहायला मिळाला. पर्यटकांनी या बिबट्याला पाहिल्यानंतर ग्रामस्थांना याची माहिती दिली. बिबट्याचा वावर वस्तीजवळ वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ह्युमन राईट्सचे तालुकाध्यक्ष प्रमोद कांडरकर यांनी वनविभागाशी संपर्क साधत बिबट्याची माहिती दिली. वन विभागाने ग्रामस्थांना  सतर्क राहण्याचे आवाहन केले असून  बिबट्या दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.