
कणकवली : मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार कणकवली शहरात अखेर अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली आहे. मोहीम सुरू करण्यापूर्वी देखील मुख्याधिकारी पाटील यांनी सर्व विक्रेत्यांना आपापली दुकाने स्टॉल हटविण्याच्या सूचना दिल्या. काही विक्रेत्यांनी स्वतःहून स्टॉल हटवायला सुरुवात केली.
`मात्र अनेक विक्रेते ऐकत नसल्याने सर्वप्रथम उड्डाणपुलाखालील बंद असलेले स्टॉल नगरपंचायत कर्मचारी स्वतःहून हटवू लागले आहेत. यामध्ये अनेक विक्रेत्यांचे कांदे, बटाटे आधी साहित्यही जप्त करून ट्रॅक्टरमध्ये भरण्यात येत आहे. अर्थातच या मोहिमेने आता वेग घेतला असून ही मोहीम कोणत्या दिशेला जाते, याची उत्सुकता सगळ्यांना लागू राहिली आहे.











