
नारायण राणेंचा भाजपला घरचा आहेर
मुंबई : बाळ माने हा भाजपचा ओरीजनल आहे. निवडणुक आली की तळ्यात-मळ्यात ते करतात. बाळ मानेला सिरीयस घेऊ नका. निवडणुक आली की बाळ माने 5 वर्षाची तडजोड करतो. त्याच्यावर विश्वास टाकायची गरज नाही. अशी टीका करत खासदार नारायण राणे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.
दरम्यान, विनायक राऊत हे काय शब्द पाळणारे आहेत का? विनायक राऊतांचे बाकी धंदे बंद झाले आहेत का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. कोणी पैसे घेतले हे मला माहिती नाही, संजय राऊतांना माहिती असेल कोणी आणि किती पैसे घेतले, कारण माघार कोणी असच घेत नाही, असं म्हणत त्यांनी संजय राऊतांच्या आरोपांनाही उत्तर दिलंय.











