
कणकवली : महामार्गावर सतत घडणारे गंभीर अपघात चालकांनी मद्यसेवन करून वाहन चालविल्याने होत आहेत. त्यावर आळा बसावा, यासाठी महामार्ग पोलिसांनी मद्यसेवन करून वाहन चालविणार्यांवर कारवाई सत्र राबविण्यास सुरुवात केली आहे. मद्यसेवन केलेल्या चार वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. चारही वाहनचालकांना कणकवली न्यायालयाने प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड ठोठावला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक राणी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवस, पोलीस अंमलदार सुरेश बिर्जे, नितीन शेट्ये, रवी इंगळे,पांडुरंग खडपकर, सागर परब यांनी ही कारवाई केली. तर तर चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे मद्यसेवन न करता महामार्गावर सुरक्षित प्रवास करावे, असे आवाहन करतानाच मद्यपी वाहनचालकांवरील कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशाराही राणी पाटील यांनी दिला आहे.











