LIVE UPDATES

तुळस घाटीत झाड कोसळून काही काळ वाहतूक ठप्प

ग्रामस्थांच्या मदतीने झाड बाजूला
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 23, 2026 07:03 PM
views 18  views

वेंगुर्ला : तालुक्यात काही गावात शुक्रवारी सायंकाळी विजांच्या गडगडाटासह बरसलेल्या जोरदार परतीच्या पावसामुळे वेंगुर्ला तुळस मार्गे सावंतवाडी मुख्य रस्त्यावर तुळस घाटी येथे मोठे झाड पडून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. ग्रामस्थांच्या सहाय्याने झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान वीज वाहिन्या तुटल्याने रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित होता. 

मुख्य रस्त्यावर झाड पडल्याची माहिती मिळताच वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे व सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र परब यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधून जेसीबीच्या सहाय्याने झाड बाजूला करण्यात मदत झाली. यावेळी सदर घटनास्थळी उपसरपंच नारायण कुंभार, पोलीस पाटील सागर सावंत, तंटामुक्त अध्यक्ष रवींद्र (नाना) राऊळ, सुभाष सावंत, गजानन कुंभार, रघुनाथ सावंत यांनी उपस्थित राहून रस्त्यावरील झाड बाजूला करण्यास मदत केली.


ताजी बातमी

View all

Class 6 students showcase and sell handmade herbal soaps as part of a practical vocational education project.
Sawantwadi News : तळवडेतील विद्यार्थ्यांनी बनवले १२५ हर्बल साबण
October 23, 2026
संजय ढवळीकर यांच्या ''माहिती हक्क कायदा परिचय आणि विश्लेषण'' पुस्तकाचे प्रकाशन
October 23, 2026
वेतन न मिळाल्यामुळे प्रशिक्षित डॉक्टरांचे वैद्यकीय महाविद्यालयासमोर आंदोलन
October 23, 2026
साटेली-भेडशीत एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
October 23, 2026
संबंधित बातम्या

View all

Class 6 students showcase and sell handmade herbal soaps as part of a practical vocational education project.
Sawantwadi News : तळवडेतील विद्यार्थ्यांनी बनवले १२५ हर्बल साबण
October 23, 2026
संजय ढवळीकर यांच्या ''माहिती हक्क कायदा परिचय आणि विश्लेषण'' पुस्तकाचे प्रकाशन
October 23, 2026
साटेली-भेडशीत एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
October 23, 2026
देवगडमध्ये तीन कृषी औषधांची उत्पादने बोगस
October 23, 2026