LIVE UPDATES

वेतन न मिळाल्यामुळे प्रशिक्षित डॉक्टरांचे वैद्यकीय महाविद्यालयासमोर आंदोलन

रुग्णालयातील रुग्णसेवेवर काहीसा परिणाम : 'जोपर्यंत वेतन नाही तोपर्यंत काम नाही' डॉक्टरांचा पवित्रा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 23, 2026 07:14 PM
views 51  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षित डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या ११८ डॉक्टरांना वेतन आदा न झाल्यामुळे उपासमारीची वेळ आली असून संबंधित मेस चालकही जेवण देत नाहीत. याबाबत लक्ष वेधण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयासमोर प्रशिक्षित डॉक्टरांनी आंदोलन छेडले. जोपर्यंत वेतन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असा इशाराही दिला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या रुग्णांची गैरसोय होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय सिंधुदुर्गनगरी येथे सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालय कार्यरत आहे. या वैद्यकीय महाविद्यालयात अनेक प्रशिक्षित डॉक्टर रुग्णांची १२ ते २४ तासही सेवा देत आहेत. जिल्हा रुग्णालयानंतर वैद्यकीय महाविद्यालयात या प्रशिक्षित डॉक्टरांमुळे रुग्णांची चांगली सेवा उपलब्ध होत आहे. परंतु या प्रशिक्षित डॉक्टरांना शासनाकडून संबंधित जेम्स मॅक्सच्या माध्यमातून गेले दोन महिने वेतन आदा न झाल्यामुळे या रुग्णालय परिसरात राहणाऱ्या या प्रशिक्षित डॉक्टरांचे राहण्याचे भाडे किंवा मेस चालकाकडून जेवण मिळणे दुरापास्त झाले आहे.

जोपर्यंत आम्हाला वेतन अदा होत नाही तोपर्यंत आम्ही रुग्णालयात काम करणार नाही असा पवित्रा वैद्यकीय महाविद्यालयातील या 118 डॉक्टरांनी घेतल्यामुळे रुग्णांची ससेहोलपट होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना योग्य पद्धतीने आम्ही सेवा देतो.

आम्हाला या प्रशिक्षण कालावधीत गेले दोन महिन्यांपूर्वी पूर्ववत वेतन येत होते. परंतु या दोन महिन्यात वेतन न आल्यामुळे आम्हाला जीवन जगणे असंहय झाले आहे अन्य वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षित डॉक्टरांचे वेतन दिले जाते मग सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनाच वेतन का नाही असा सवाल या इंटर्न डॉक्टरांनी केला आहे. यावेळी श्रेयस वाघमोरे सिद्धी साताडेकर, पंकज ढोरे, दीपक निमकर, हर्ष शिंगारे आदींसह ११८ प्रशिक्षित डॉक्टर उपस्थित होते.


ताजी बातमी

View all

आजगाव मराठी ग्रंथालयात ‘अशोक शिरोडकर स्मृती बालवाचनालया’चे उद्घाटन
October 23, 2026
Class 6 students showcase and sell handmade herbal soaps as part of a practical vocational education project.
Sawantwadi News : तळवडेतील विद्यार्थ्यांनी बनवले १२५ हर्बल साबण
October 23, 2026
संजय ढवळीकर यांच्या ''माहिती हक्क कायदा परिचय आणि विश्लेषण'' पुस्तकाचे प्रकाशन
October 23, 2026
तुळस घाटीत झाड कोसळून काही काळ वाहतूक ठप्प
October 23, 2026
संबंधित बातम्या

View all

#kokansadlive#news update#konkan update#
आंबोली आरोग्य केंद्रात सर्वंकष आरोग्य सेवा प्रशिक्षण
October 23, 2026
#kokansadlive#news update#konkan update#breaking news
१ लाख १७ हजार बालकांना मिळणार जंतनाशक गोळ्या
October 22, 2026
शिरवलमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी आरोग्य व सल्ला शिबिर
October 17, 2026
Dr Swapnil Sangle and Sanju Parab inspect the proposed site for government quarters for doctors near Sawantwadi Hospital.
Sawantwadi Hospital News : डॉक्टरांना गव्हर्नमेंट क्वार्टर्ससाठी हालचाली, आरोग्यमंत्र्यांच्या ओएसडींकडून पाहणी
October 17, 2026