LIVE UPDATES

Sawantwadi water supply project : ऑडिटर अनुपस्थित मग प्रश्न कोणाला विचारणार ?

उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचा सवाल
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 23, 2026 04:31 PM
views 92  views
Controversy over the ₹57 crore Sawantwadi water supply project audit report

सावंतवाडी : नगरपरिषदेत ५७ कोटींच्या नळपाणी योजनेच्या 'थर्ड पार्टी ऑडिट रिपोर्ट'बाबत पार पडलेली विशेष सर्वसाधारण सभा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तांत्रिक लेखापरीक्षण करणारे 'सीओईपी' तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे येथील मुख्य अन्वेषक तथा स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. नामदेव हेराऊत सभेला अनुपस्थित राहिल्याने "विशेष सभेत प्रश्न कोणाला विचारणार?" असा सवाल उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी उपस्थित केला आहे.

या सभेला ॲड. निरवडेकर हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. मात्र, ऑनलाईन जोडणीत तांत्रिक अडचणींमुळे सभेत चाललेला संवाद सुस्पष्टपणे ऐकू येत नव्हता. त्यामुळे नळपाणी योजनेच्या या अत्यंत महत्त्वाच्या तांत्रिक अहवालावर सविस्तर चर्चा होण्यासाठी ही विशेष बैठक पुन्हा आयोजित करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर प्रशासनाच्या कारभारावर टीका करताना सादर करण्यात आलेला तांत्रिक लेखापरीक्षण अहवाल हा केवळ एप्रिल २०२६ पर्यंतच्या कामावर आधारित आहे. मात्र, आम्ही स्वतः ९ जुलै रोजी या योजनेच्या कामात होत असलेल्या गंभीर अनियमिततेबाबत अधिकृत पत्र दिले होते.

त्यामुळे एप्रिलनंतरच्या कालावधीत कामात काय अनियमितता झाली, हे या ऑडिट रिपोर्टमध्ये आलेल नाही. योजनेत सर्व काही अलबेला आहे अशा पद्धतीने थातूरमातूर सभा घेऊन सावंतवाडीच्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार चालला असून तो आम्ही कदापि खपवून घेणार नाही, असा इशाराही उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी दिला आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत आणि नळपाणी योजनेतील गोंधळाबाबत लवकरच पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील भूमिका जनतेसमोर स्पष्ट करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.


ताजी बातमी

View all

‘कोकणसाद LIVE’ इम्पॅक्ट, गडनदीवरील केटी बंधाऱ्याच्या प्लेट बसवण्यास सुरुवात
October 23, 2026
संदीप चौकेकर मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता
October 23, 2026
Rajapur illegal Goa liquor news : गोवा बनावटीच्या दारूविरोधात भाजपचे ठिय्या आंदोलन
October 23, 2026
आचिर्णेतील बायोडायव्हर्सिटी पार्कच्या अभ्यासासाठी शिष्टमंडळ कोल्हापूर विद्यापीठात
October 23, 2026
संबंधित बातम्या

View all

‘कोकणसाद LIVE’ इम्पॅक्ट, गडनदीवरील केटी बंधाऱ्याच्या प्लेट बसवण्यास सुरुवात
October 23, 2026
संदीप चौकेकर मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता
October 23, 2026
Rajapur illegal Goa liquor news : गोवा बनावटीच्या दारूविरोधात भाजपचे ठिय्या आंदोलन
October 23, 2026
आचिर्णेतील बायोडायव्हर्सिटी पार्कच्या अभ्यासासाठी शिष्टमंडळ कोल्हापूर विद्यापीठात
October 23, 2026