
दोडामार्ग : ग्रामपंचायत साटेली भेडशी आयोजित एसटी बस मध्ये पन्नास टक्के सवलत योजना एनसीएमसी स्मार्ट कार्ड विशेष कॅम्पला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास 150 हून अधिक लाभार्थ्यांना कार्डचे रजिस्ट्रेशन करण्यात आले. सदरचा हा कॅम्प शनिवारी सुरू राहणार असून याची लाभार्थ्यांनी नोंद घेऊन आपल्या कार्डची नोंदणी करावी असे आवाहन सरपंच छाया धरणे यांनी केले आहे.
एसटी बस मध्ये महिला सन्मान योजना महिलांना सर्व प्रकारच्या एसटी बस प्रवासात ५० टक्के सूट मिळते. ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत मिळते तर अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेत ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत (१०० टक्के) प्रवास सवलत आहे. तसेच इतर घटकामध्ये येणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, राज्य पुरस्कार विजेते, ५ वी ते १२ वी पर्यंतच्या ग्रामीण भागातील मुली (अहिल्याबाई होळकर योजना), पत्रकार (शिवशाही बसमध्ये ८०० किमी पर्यंत), एड्स, सिकलसेल, डायलिसिस आणि हिमोफिलियाचे रुग्ण यांनाही सवलतीच्या दरात प्रवास करायला मिळतो.
यासाठी एसटी महामंडळाकडून एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या कार्डची नोंदणी तालुक्याच्या ठिकाणी दोडामार्ग बसस्थानक येथे केली जात होती. मात्र, याठिकाणी साटेली भेडशी परिसरातील लाभार्थ्यांना जाणे गैरसोयीचे होते. काही लाभार्थ्यांनी दोडामार्ग येथे जात या कार्डची नोंदणी केली तर काही लाभार्थी हे कार्ड काढण्यापासून वंचित होते. यासाठी जवळपास सोय उपलब्ध व्हावी व लाभार्थ्यांना हे कार्ड काढण्यासाठी सुलभ व्हावे यासाठी सरपंच छाया धर्णे यांनी मागणी करत ग्रामपंचायत साटेली भेडशी येथे एनसीएमसी स्मार्ट कार्ड या विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
या विशेष कॅम्पला साटेली भेडशीसह परिसरातील लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नोंदणी करणाऱ्यांची संख्या वाढल्याने शनिवारी ही हा विशेष कॅम्प सुरू राहणार असून ज्यांना ही कार्ड काढून घ्यायची आहेत त्यांनी या कॅम्पचा लाभ घेत आपली नोंदणी करावी असे आवाहन सरपंच छाया धर्णे यांनी केले आहे. गौरवी सावंत यांनी ही नोंदणी प्रक्रिया राबविली. हे कार्ड नोंदणी करण्यासाठी आधारकार्ड, आधारलिंक मोबाईल आणि 230 रुपये फी या बाबी आवश्यक आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








