LIVE UPDATES

देवगडात मुसळधार पावसानंतर जोर ओसरला

किनारपट्टी भागात वाऱ्याचा प्रभाव कायम
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 07, 2026 19:23 PM
views 22  views

देवगड : देवगड तालुक्यात सोमवारी पावसाने काहीशी विश्रांती घेतली. दिवसभरात ३३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, यंदाच्या हंगामात आतापर्यंत एकूण १,१६३ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर जोर ओसरल्याने तालुक्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. मात्र किनारपट्टी भागात अजूनही वाऱ्याचा प्रभाव कायम असून, वाऱ्याचा वेग काहीसा मंदावला असला तरी वातावरण दिवसभर ढगाळ राहिले.

दरम्यान, मौजे नाडण येथे मालती मधुकर बाईत यांच्या घरावर सुपारीचे झाड कोसळल्याने घरावरील पत्र्यांचे नुकसान झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. नुकसानीचा पंचनामा करून अहवाल लवकरच सादर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.