LIVE UPDATES

प्रतिथयश व्यापारी निलेश पावसकर यांचं निधन

बाजारपेठ बंद ठेवून श्रद्धांजली
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 07, 2026 20:31 PM
views 66  views

सिंधुदुर्गनगरी : कसाल बाजारपेठ येथील प्रतिथयश व्यापारी वासुदेव उर्फ निलेश अंकुश पावसकर (वय ५८) यांचे मंगळवारी दुपारी उपचारादरम्यान निधन झाले.

कसाल बाजारपेठेत पावसकर बंधूंचे किराणा मालाचे दुकान असून, ते व्यापारी क्षेत्रातील परिचित व्यक्तिमत्त्व होते. ते कसाल बाजारपेठ व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष उमेश पावसकर तसेच बिल्डिंग मटेरियल व्यावसायिक संदीप पावसकर यांचे बंधू होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ, एक बहीण, वहिनी आणि पुतणे असा मोठा परिवार आहे.

त्यांच्या आकस्मिक निधनाने कसाल परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कसाल बाजारपेठ बंद ठेवून व्यापाऱ्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.