
कुडाळ : कुडाळ शहरातून रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून याविषयी ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कुडाळ कार्यालयावर आज सकाळी ११ वाजता धडक दिली. यावेळी बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता ईश्वर बामणे यांच्यावर रस्त्याच्या दूरवस्थेवरून जाब विचारण्यात आला. यावेळी कनिष्ठ अभियंता ईश्वर बामणे हा रस्ता दिवाळीपूर्वी खड्डेमुक्त करून दिवाळीनंतर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले. तर वरिष्ठ अभियंता पिसाळ यांना निवेदन देण्यात आले.
कुडाळ रेल्वेस्टेशनकडून जाणारा रस्ता पूर्ण खड्डेमय झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने गणपती सणापूर्वी दुरुस्त करण्यात येईल, असे आश्वासन ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांना दिले होते. मात्र, अद्याप हा रस्ता जैसे थे परिस्थितीत असून दिवाळी सणापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करा असे निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
जर रस्त्याचे काम दिवाळी सणापूर्वी पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, शहरप्रमुख संतोष शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, ठाकरे सेना शहर प्रवक्ते बाळा पावसकर, अमित राणे, पंचायत समिती सदस्य योगेश धुरी, गुरु गडकर, संदीप महाडेश्वर, गोट्या चव्हाण, बाळा वेंगुर्लेकर, सुशील चिंदरकर, संजय बोभाटे, शैलेश जळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








