LIVE UPDATES

Sawantwadi Water Supply Scheme : भाजपमध्ये दोन गट असल्याचे झाले सिद्ध

'त्या' घोटाळ्याची चौकशी का नाही ? ; बाबू कुडतरकर यांचा सवाल
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 27, 2026 03:07 PM
views 79  views
Babu Kudtarkar criticises BJP over Sawantwadi water supply scheme controversy

सावंतवाडी : विरोधक म्हणून “आम्ही गप्प नाही, उलट नळपाणी योजनेच्या विषयावर पहिला आवाज आम्हीच उठवला. विशेष सभेच्या अहवालात ऑडिटरच उपस्थित नसतील, तर प्रश्न विचारायचे कोणाला ? हा प्रश्न आम्ही सर्वप्रथम उपस्थित केला होता. त्यामुळे विशेष सभा घेऊन नेमके काय साध्य केले ?” असा सवाल करत शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी भाजपवर पलटवार केला. तर भाजपात दोन गट असल्याचे सिद्ध झाल्याची टिका देखील त्यांनी केली. तर पाणी पुरवठा विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी अजून का लागत नाही असाही सवाल त्यांनी केला. 

ते म्हणाले की, उपनगराध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन नळपाणी योजनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केल्याने भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा समोर आले आहेत. भाजपमध्ये दोन गट असल्याने त्यांच्यातच संवाद नसल्यामुळे उपनगराध्यक्षांना पत्रकार परिषद घेऊन हे प्रश्न जनतेसमोर मांडावे लागत आहेत, असा आरोप श्री. कुडतरकर यांनी केला.

नळपाणी योजनेच्या कामाबाबत विरोधकांवर टीका करण्यापेक्षा उपनगराध्यक्ष उपनगराध्यक्षांनी नगराध्यक्षांसोबत एकत्र पत्रकार परिषद घ्यावी आणि योजनेबाबत असलेले सर्व प्रश्न जनतेसमोर मांडावेत, असा टोलाही लगावला. नळपाणी योजनेच्या विषयावर आम्ही सुरुवातीपासूनच प्रश्न उपस्थित करत आलो आहोत.

पाणीपुरवठा विभागाचा भ्रष्टाचार आमच्या शिवसेना महिला नगरसेविकांनी उघडकीस आणला हे उपनगराध्यक्षांनी विसरू नये. तसेच त्या भ्रष्टाचारचा अजूनही विभागगिय चौकशी का  होत नाही ? याचे उत्तर जनतेसमोर स्पष्ट करावे अशी मागणीही कुडतरकर यांनी केली.


ताजी बातमी

View all

Sindhudurg Local Crime Branch arrests absconding suspect in Pune in Kudal crime case
Kudal Crime News : कुडाळमधील गुन्ह्यातील फरार संशयिताला पुण्यातून घेतले ताब्यात
October 27, 2026
सावंतवाडी नगरपालिकेतील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीची मागणी काँग्रेस करणार
October 27, 2026
बांद्यात दिवाळीनिमित्त डबलबारीचा जंगी सामना, नरकासुर स्पर्धेचेही आयोजन
October 27, 2026
बांदा येथे ७ नोव्हेंबरला नरकासुर स्पर्धेचे आयोजन
October 27, 2026
संबंधित बातम्या

View all

सावंतवाडी नगरपालिकेतील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीची मागणी काँग्रेस करणार
October 27, 2026
बांद्यात दिवाळीनिमित्त डबलबारीचा जंगी सामना, नरकासुर स्पर्धेचेही आयोजन
October 27, 2026
बांदा येथे ७ नोव्हेंबरला नरकासुर स्पर्धेचे आयोजन
October 27, 2026
वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त
October 27, 2026