LIVE UPDATES

प्रांताधिकाऱ्यांच्या विरोधात शिक्षक एकवटले

निलंबनाची जोरदार मागणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 29, 2026 16:19 PM
views 274  views

प्रकरण काय ? 

कणकवली : देवगड येथे बीएलओ प्रशिक्षणा संदर्भात प्राथमिक शिक्षकांसोबतच्या बैठकीत प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी शिक्षकांना उद्देशून आक्षेपार्ह शब्द वापरल्याच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व शिक्षक सोमवारी दुपारी कणकवलीत प्रांताधिकारी कार्यालयासमोर एकवटले. शिक्षकांनी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करतानाच कातकर यांच्या निलंबनाची देखील मागणी केली.

शिक्षकांनी 'कणकवली प्रांताधिकारी यांचा निषेध असो', 'कर्मचारी एकजुटीचा, विजय असो', 'हम सब एक है', _हमारी युनियन, हमारी ताकद' 'हमसे जो टकरायेगा, मिट्टी मे मिल जायेगा' अशी जोरदार घोषणाबाजी केली. प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी यापूर्वी देखील आक्षेपार्ह विधाने केली असल्याचे शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांनी भाषणामध्ये सांगितले. याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी लक्ष द्यावे, अशी मागणीही करण्यात आली. प्रांताधिकारी जगदीश कातकर यांचे निलंबन होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा देखील शिक्षकांनी दिला.

सद्यस्थितीत हे आंदोलन अद्यापही सुरूच आहे. आंदोलनात शिक्षक संघटना पदाधिकारी राजन कोरगावकर, राजन वालावलकर, राजेंद्र सकपाळ, श्री. मदने आधी सहभागी झाले आहेत.