
सिंधुदुर्ग : ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूकीमध्ये निलेश सांबरे विजयी झालेत. विक्रमगड सेवा सोसायटी मतदारसंघातून संचालक पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे. या ऐतिहासिक निवडीच्या पार्श्वभूमीवर आज ठाणे येथील कार्यालयात कुटुंबीय, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी हा सन्मान माझा नसून, 'जिजाऊ'च्या माध्यमातून गेली २० वर्षे समाजहितासाठी केलेल्या कार्यावर आपण व्यक्त केलेल्या विश्वासाचा आहे. विजयाचा हा आनंद सर्वांसोबत साजरा करताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नव्या सहकार पर्वाविषयीचा उत्साह आणि आशावाद स्पष्टपणे दिसून आला. हा विजय माझी जबाबदारी अधिक वाढवणारा आहे. सभासद, शेतकरी, कष्टकरी, महिला, युवा आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी माझे कार्य यापुढेही अधिक जोमाने आणि तितक्याच निष्ठेने सुरू राहील असा विश्वास श्री. सांबरे यांनी व्यक्त केला.










