LIVE UPDATES

वेंगुर्लेत उद्या विद्यार्थी गुणगौरव समारंभ

तालुका शिवसेना - आमदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळाचे आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 29, 2026 17:36 PM
views 41  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुका शिवसेना आणि आमदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळ, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन उद्या मंगळवार दिनांक ३० जून रोज करण्यात आले आहे. 

बॅ. नाथ पै कम्युनिटी सेंटर सभागृह, कॅम्प,वेंगुर्ला येथे सकाळी ११ वाजता हा समारंभ होणार आहे. यावेळी फेब्रुवारी /मार्च २०२६ च्या इयत्ता दहावी व बारावी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या वेंगुर्ला तालुक्यातील प्रत्येक माध्यमिक शाळेतील गुणानुक्रमे प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. या समारंभाला शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत व मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तरी वेंगुर्ला तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या सर्व आजी माजी पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिकांनी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी केले आहे.