
सावंतवाडी : शहरात पडलेले खड्डे योग्य पद्धतीने बुजविण्याची कार्यवाही नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आली आहे. या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांकडे सभापती मोहीनी मडगावकर यांनी लक्ष वेधले होते. तर चुकीच्या पद्धतीने होणार काम नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी रोखले होते. याबाबत नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावल्यानंतर योग्य पद्धतीने कामास प्रारंभ झाला असून ते खड्डे बुजविण्यात आले आहेत.
मोती तलाव शेजारी मुख्य रस्त्यावर हे खड्डे पडले होते. यामुळे अपघात होऊन नागरिकांना दुखापण होत होती. याबाबत पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर व भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी न.प.च्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेत निर्देश दिले होते. त्यानंतर हे खड्डे बुजविण्यात येत होते. मात्र, चुकीच्या पद्धतीने हे खड्डे बुजविण्यात येत असल्याने नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी ते काम रोखल होत. योग्य पद्धतीने काम करण्याची मागणी त्यांनी केली होती. अधिकाऱ्यांच बोगस काम त्यांनी उघड पाडलं होते. यानंतर नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी संबंधित विभागाची कान उघडघणी केली. त्यानंतर आज योग्य पद्धतीने खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे










