LIVE UPDATES

वैभववाडीत तालुकास्तरीय ‘श्रावणसरी’ काव्यसंमेलन

६ सप्टेंबर रोजी आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 25, 2026 15:17 PM
views 43  views
#kokansadlive#news update#konkan update#

वैभववाडी : अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंच, वैभववाडी यांच्या वतीने येत्या ६ सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय ‘श्रावणसरी’ काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ कवी स्वर्गीय नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आंबेडकर भवन येथे हे काव्यसंमेलन होणार आहे.

या काव्यसंमेलनात तालुक्यातील प्रथम नोंदणी करणाऱ्या ३० कवी-कवयित्रींना आपल्या स्वरचित कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे. नवोदित तसेच हौशी कवी-कवयित्रींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कविता सादर करणाऱ्या सर्व कवी-कवयित्रींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील कवी-कवयित्रींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कविता सादरीकरणासाठी नावनोंदणीची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२६ आहे. इच्छुकांनी कवी चेतन बोडेकर, प्रफुल्ल जाधव किंवा संदेश तुळसणकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंचचे अध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील यांनी केले आहे.