
सिंधुदुर्गनगरी : एड्युस्मार्ट इन्क, ओरोस येथील फ्लायिंग टॉट्स प्रिस्कुलच्या सिनियर केजीची विद्यार्थिनी लार्मिका निलेश तवटे हिने सिंगापूर येथे आयोजित आंतरराष्ट्रीय गणित आणि मानसिक अंकगणित स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत वैयक्तिक गटात चौथा क्रमांक पटकावला. मानसिक अंकगणित या स्पर्धेत लार्मिकाने आपल्या बुद्धिमत्ता, वेग आणि अचूकतेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. तिच्या या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह एड्युस्मार्ट इन्क, ओरोसच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या उल्लेखनीय यशासाठी लार्मिकाला तिचे पालक तसेच मार्गदर्शक आसावरी मळीक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल एड्युस्मार्ट इन्क, ओरोस आणि फ्लायिंग टॉट्स प्रिस्कुल तर्फे तिचे अभिनंदन करण्यात येत असून, भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. लार्मिका निलेश तवटे हिच्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










