LIVE UPDATES

संरक्षण मंत्र्यांच्या गोवा दौऱ्यानिमित्त पत्रादेवी येथे अवजड वाहनांना प्रवेशबंदी

सुधारित वेळेनुसार दुपारी ४ ते रात्री १० पर्यंत तात्पुरती प्रवेशबंदी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 25, 2026 18:27 PM
views 47  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्गनगरी : देशाचे संरक्षण मंत्री यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गोवा प्रशासनाच्या विनंतीनुसार दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सुधारित वेळेनुसार दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली चेकपोस्टवरून पत्रादेवीमार्गे गोवा राज्यात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांना तात्पुरती प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

संरक्षण मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी ही खबरदारीची उपाययोजना करण्यात आली आहे. या कालावधीत नागरिकांनी तसेच वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे. अवजड वाहनचालकांनी या कालावधीत पत्रादेवीमार्गे गोव्याच्या दिशेने प्रवास टाळून पर्यायी मार्गांचा वापर करावा.