
सावंतवाडी : सिंधुरत्न योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या 'सुकून' प्रकल्पाचे उद्घाटन माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. सोनुर्ली येथील 'मेड फॉर यू' येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
सोनुर्ली पोट्येकुंबयेवाडी येथे मेड फॉर यू हा पर्यटन प्रकल्प उभारण्यात आला असून तेथे आता सिंधुरत्न योजनेअंतर्गत 'सुकून' प्रकल्प उभारण्यात आला आहे. याचे उद्घाटन माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप यांची विशेष उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते फीत कापून याचे उद्घाटन करण्यात आले.
बालीच्या धर्तीवर हा प्रकल्प साकारला असून ॲडव्हेंचर स्पोर्ट्सह आता राहण्याचीही उत्तम सोय इथे उपलब्ध होणार आहे. याप्रसंगी सावंतवाडीचे नगरसेवक देव्या सुर्याजी, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, माजी सभापती प्रमोद सावंत, महेश सामंत, नरेंद्र तारी, समिधा तारी, करूणेश तारी, सीमरन तारी, क्रीश तारी आदी उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








