
सावंतवाडी : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे पावसाच्या पहिल्याच सरीत घारपी-असनिये रस्त्याची साईड पट्टी वाहून गेली. यामुळे सर्व माती रस्त्यावर आली असून अपघात होऊन ८ ते १० ग्रामस्थ जखमी झालेत. यामुळे प्रशासनाच्या या कारभारावर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
साईड पट्टी वाहून गेली असताना आता समोरून गाडी आल्यास दुसऱ्या गाडीला साईड द्यायला देखील जागा नाही आहजे. त्यामुळे एसटी देखील बंद केल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. नुकताच पाऊस सुरू झाला असून आताच ही परिस्थिती असेल तर येणाऱ्या दोन महिन्यात काय परिस्थिती होईल ? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्याला गटार देखील मारले नसल्याने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.












