LIVE UPDATES

हायवेवर ओमनीची चालत जाणाऱ्या वृद्धेला ठोकर

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 06, 2026 20:50 PM
views 104  views

कणकवली : मुंबई- गोवा महामार्गावर हूंबरठ एसपी बोअरवेल ऑफिस समोर गोवा -मुंबई लेनने चालत जात असलेल्या मनोरमा दिगंबर पाटील (७५, रा. हुंबरट) यांना अज्ञात पांढऱ्या रंगाच्या ओमनी कारने धडक दिली. अपघातानंतर कारचालक पसार झाला. या अपघातात मनोरमा गंभीररित्या जखमी झाल्या. त्यांना स्थानिकांनी उपचारासाठी प्रथम कणकवली उपजिल्हा रुग्णालय आणि तेथून अधिक उपचारासाठी गोवा- बांबुळी येथे दाखल केले.

त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. हा अपघात सोमवारी सायंकाळी ६.४५ वा. च्या सुमारास घडला. अपघाताची खबर यश रामचंद्र मेस्त्री (रा.वरवडे )यांनी कणकवली पोलिसात दिली. त्यानुसार अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.