
सावंतवाडी : भाजपच्या महिला शहराध्यक्ष तथा नगरसेविका मोहिनी मडगावकर आज पत्रकार परिषद घेणार असून त्या पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे नाराज असल्याचे समजत आहे. न.प.तील सत्ताधाऱ्यांत अंतर्गत धुसफूस, पक्षातील कुरघोडींच्या पार्श्वभूमीवर त्या आज काय बोलणार ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. गेले काही दिवस सत्ताधारी नगरसेवकांमध्ये अंतर्गत धुसफुस असल्याची चर्चा शहरात आहे. पक्षांतर्गत कुरघोडी बघता मोहिनी मडगावकर या नाराज असल्याचे समजत आहे. त्यामुळे सौ. मडगावकर काय बोलणार ? याकडे अनेकांच लक्ष लागून राहिले आहे.










