
सावर्डे : कलावर्तन्यास उजैन, मध्यप्रदेश यांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील चित्रस्पर्धेचे हे 27वे वर्ष असून, देशभरातील विविध राज्यांतून स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. या स्पर्धेत सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्राचा झेंडा उंचावला आहे.
या स्पर्धेत सौरभ साठे यास उत्कृष्ट कलाकृतीसाठी सुवर्णपदक प्रदान करण्यात आले, तर सिद्धार्थ भोवड यास प्रभावी सर्जनशीलतेबद्दल रोख रकमेचे पारितोषिक मिळाले आहे. या स्पर्धेमधून निवड होणे त्या विद्यार्थ्यांसाठी व कलामहाविद्यालयासाठी खूप अभिमानाची गोष्ट असते. त्यामुळे कलामहाविद्यालयाचे व सह्याद्री शिक्षण संस्थेचे नाव उंचावले आहे.
विद्यार्थी देखील आपल्या या यशाचे श्रेय कलामहाविद्यालयास देत आहेत. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्यध्यक्ष व संगमेश्वर -चिपळूण मतदार संघांचे आमदार शेखर निकम, संस्थेचे सेक्रेटरी महेश महाडिक, ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार मा. प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के, पूजाताई निकम,अनिरुद्ध निकम कलामहाविद्यालयाचे प्राचार्य. माणिक यादव तसेच प्राध्यापकवर्ग यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.













