LIVE UPDATES

किशोरवयीन मुलांच्या क्षमता बांधणीसाठी सिंधुदुर्गात कार्यशाळा

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 24, 2026 05:53 PM
views 8  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

सिंधुदुर्गनगरी : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या आयोजनातून किशोरवयीन मुला-मुलींच्या क्षमता बांधणीसाठी दोन दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन शरद कृषी भवन, सिंधुदुर्गनगरी येथे उत्साहात संपन्न झाले.

या उद्घाटनप्रसंगी डॉ. अपूर्वा बासुर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग ,श्रीमती अंजू उप्पल, सल्लागार, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई, डॉ. रवींद्र चौधरी, सहाय्यक संचालक, किशोरवयीन आरोग्य कार्यक्रम, पुणे, डॉ. संदीप राऊत, सल्लागार, किशोरवयीन आरोग्य कार्यक्रम, पुणे, डॉ. सई धुरी, जिल्हा आरोग्य अधिकारी, सिंधुदुर्ग तसेच डॉ. स्वप्निल मालखेडे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम (RKSK) अंतर्गत किशोरवयीन मुला-मुलींचे शारीरिक, मानसिक, भावनिक व सामाजिक आरोग्य सुदृढ करण्यासोबतच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, निर्णयक्षमता, नेतृत्वगुण व जीवनकौशल्ये विकसित करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे.

या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये किशोरवयीन आरोग्य, पोषण, मानसिक स्वास्थ्य, लैंगिक व प्रजनन आरोग्य, मासिक पाळी व्यवस्थापन व स्वच्छता, व्यसनमुक्ती, डिजिटल सुरक्षितता, शिक्षण आणि करिअरविषयक मार्गदर्शन अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सहभागी आधारित पद्धतीने चर्चा व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षित मास्टर ट्रेनर तयार करण्यात येणार असून, या मास्टर ट्रेनर्सच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्र स्तरावरही पुढील प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे किशोरवयीन आरोग्यविषयक माहिती व मार्गदर्शन तळागाळापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.

या कार्यशाळेत किशोरवयीन मुला-मुलींसह आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग, पंचायत राज विभागाचे अधिकारी-कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

किशोरवयीन मुला-मुलींना योग्य मार्गदर्शन, आरोग्यविषयक माहिती आणि समुपदेशन उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय निर्माण होण्यास ही कार्यशाळा निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Sindhudurg News : बॉक्सिंग स्पर्धेत आर्य आवटीला कांस्य
November 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Kudal News : एकाच छताखाली सहा फूड आउटलेट्स अन् २७ आलिशान खोल्या
November 24, 2026
India A celebrates its seven-wicket victory against UAE in the Rising Stars Asia Cup 2026
यूएईवर इंडियाचा दणदणीत विजय! ७ विकेट्सनी मात करत 'इंडिया ए'ची 'रायझिंग स्टार्स आशिया कप'च्या उपांत्य फेरीत धडक
November 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
दीक्षित फाउंडेशनच्या उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा
November 24, 2026
संबंधित बातम्या

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Kudal News : एकाच छताखाली सहा फूड आउटलेट्स अन् २७ आलिशान खोल्या
November 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
दीक्षित फाउंडेशनच्या उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा
November 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Leopard Attack Dodamarg : घरात घुसून बिबट्याकडून 8 पिल्लांचा फडशा
November 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Vengurla News : जि. प .अध्यक्ष प्रमोद कामतांनी घेतले मातोंड देवी सातेरीचे दर्शन
November 24, 2026