LIVE UPDATES

इन्सुली येथे भरधाव कार दुभाजकावर आदळून पलटी

गोव्यातील चौघेजण जखमी : दोघांची प्रकृती गंभीर
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 19, 2026 20:38 PM
views 54  views

सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुली येथील एका ढाब्यासमोर भरधाव वेगातील कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार दुभाजकावर आदळून पलटी झाली. या अपघातात चौघेजण जखमी झाले असून बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यात फ्रान्सिस परेरा (वय ४८, रा. म्हापसा), रसेल डिसोझा (वय ४९, रा. मडगाव), आन्सल डिसोझा (वय ६०) आणि रॉनीता (वय ३५, रा. दमण, गोवा) हे जखमी झालेत. अधिक उपचारासाठी त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका जखमीवर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.