LIVE UPDATES

लवकरच सिंधुदुर्गातील शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा प्रकल्प

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न : प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 19, 2026 14:26 PM
views 87  views

मुंबई : महाप्रीतच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा सुविधा निर्माण करण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रकल्पाचा आढावा घेतला. तसेच प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी बैठकीस मत्स्यआयुक्त प्रेरणा देशभ्रतार, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचाल तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग हा पावसाळी जिल्हा असल्याने येथील हवामानाचा सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्थानिक हवामानाचा अभ्यास करून, त्यानुसार तांत्रिक नियोजन आणि प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना पालकमंत्री राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश यावेळी दिले.