
कणकवली : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शासकीय विश्रामगृह, कणकवली येथे शिवसेना कुडाळ-मालवण विधानसभा प्रमुख (अ.जा.) प्राजक्त चव्हाण यांनी भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसह न्याय्य मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
शिक्षकांच्या समस्या, प्रलंबित मागण्या तसेच शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या माध्यमातून व्यापक स्तरावर काम करण्यात येणार आहे. शिक्षकांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करून त्यांच्या मागण्या शासनदरबारी प्रभावीपणे मांडण्याच्या उद्देशाने संघटनेची जिल्हा व तालुकास्तरीय रचना अधिक सक्षम करण्यावर यावेळी भर देण्यात आला.
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी अविनाश परीट, उपाध्यक्षपदी सतीश तवटे, तर सचिवपदी सुभाष खरात यांची निवड करण्यात आली. या नियुक्त्यांमुळे जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघटितपणे कार्य करण्यास बळ मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या भेटीदरम्यान संघटनेचे कानडे सर, वेंगुर्लेकर सर, सर्व तालुकाध्यक्ष व विविध पदाधिकारी उपस्थित होते. तसेच कणकवली तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष चोडणकर सर यांचीही उपस्थिती होती. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचा सातत्याने पाठपुरावा करणे, शैक्षणिक क्षेत्रातील समस्या संबंधित स्तरावर मांडणे आणि शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी आगामी काळात महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना सक्रिय भूमिका बजावणार आहे. जिल्हा व तालुकास्तरीय कार्यकारिणीच्या माध्यमातून संघटनेचे काम अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








