LIVE UPDATES

Sindhudurg Free Dialysis Service : सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार

पालकमंत्री नितेश राणेंच्या सूचनेनंतर जिल्हा प्रशासनाची कार्यवाही
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 09, 2026 11:59 AM
views 140  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील वैभववाडीसह जिल्हा महिला रुग्णालय कुडाळ, उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला, ग्रामीण रुग्णालय पेंडुरकट्टा व दोडामार्ग येथे महाडायलेसीस योजनेंतर्गत किडनीच्या आजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी सुरू असलेली मोफत डायलेसिस सेवा कायम सुरू राहणार आहे.

या सेवेसाठी आवश्यक औषधे व इतर साहित्य पुरवठा मुबलक उपलब्ध करुन द्या. तसेच सेवा पुरविणाऱ्या कंपनीची थकीत बिले तात्काळ अदा करा. सेवे अभावी रुग्णांची गैरसोय नको. अशा सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांनी महाडायलेसिस योजनेच्या जिल्हा समन्वयक यांना संपर्क साधत ही सेवा विनाखंड सुरु ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग महाडायलेसिस  योजनेंतर्गत मोफत डायलेसिस सेवा पुरविण्यात येत आहे. ही सेवा पुरविणाऱ्या मे. एचएलएल लाईफ केअर लि. या कंपनीने सेवा पुरविल्याची बिले न मिळाल्याने ही सेवा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्याचा इशारा रुग्णालय प्रशासनाला व रुग्णांना लेखी नोटिशीद्वारे दिला होता. त्यामुळे जिल्ह्यातील डायलेसिस रुग्णांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सक, सिंधुदुर्ग यांनी कंपनीच्या जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधून डायलेसिस सेवा विनाखंड सुरू ठेवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. जिल्हा समन्वयकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांच्या डायलेसिस युनिटला पुरविण्यात येणारी आवश्यक औषधे व इतर साहित्याचा साठा पुढील दोन आठवड्यांपुरता उपलब्ध आहे. त्यामुळे या कालावधीत डायलेसिस सेवा सुरू राहणार आहे.

दरम्यान, डायलेसिस सेवा पुरविणाऱ्या संबंधित कंपनीला शासनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या प्रतिपूर्तीच्या रकमेतून केवळ २५ टक्के रक्कम कॉर्पस फंडासाठी वजा करून उर्वरित पूर्ण रक्कम अदा करण्याबाबत आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून रुग्णालय प्रमुखांना कार्यालयीन पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच संबंधित कंपनीची थकीत देयके तातडीने अदा करण्याबाबत शासनस्तरावर योग्य तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाडायलेसीस योजनेंतर्गत उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णालयांमधील मोफत डायलेसिस सेवा विनाखंड सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


ताजी बातमी

View all

Traditional Marathi Bhajan performance featuring singers, Taal and Mridang with modern 20-20 Bhajan style
Bhajan Tradition in Maharashtra : भजन - काळ बदलला, सूर नाही
November 24, 2026
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची विशाल परब यांनी घेतली सदिच्छा भेट
November 24, 2026
Shri Devi Mauli Temple in Sonurli, known as Prati Pandharpur of South Konkan
Sonurli Mauli Temple : सोनुर्लीची माऊली... ‘प्रति पंढरपूर’ का म्‍हणतात ?
November 24, 2026
Forest Department seizes timber after illegal tree cutting at Talekhol Gadganjawadi in Dodamarg
Dodamarg Illegal Tree Cutting : तळेखोलमध्ये अवैध वृक्षतोडीवर वनविभागाची कारवाई
November 24, 2026
संबंधित बातम्या

View all

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची विशाल परब यांनी घेतली सदिच्छा भेट
November 24, 2026
Shri Devi Mauli Temple in Sonurli, known as Prati Pandharpur of South Konkan
Sonurli Mauli Temple : सोनुर्लीची माऊली... ‘प्रति पंढरपूर’ का म्‍हणतात ?
November 24, 2026
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ‘हे चांदणे फुलांनी’ संगीत मैफल
November 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
किशोरवयीन मुलांच्या क्षमता बांधणीसाठी सिंधुदुर्गात कार्यशाळा
November 24, 2026