
वेंगुर्ला : विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा मानून सिद्धेश परब मित्र मंडळाने यंदाही आपली 14 वर्षांची परंपरा जपली आहे. यावर्षी वारकऱ्यांच्या प्रवासाचा विचार करून फळ, बिस्कीट आणि थंड पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
शिरोडा गावातील तसेच वेंगुर्ला तालुक्यातील 50 हून अधिक वारकरी एस.टी. महामंडळाच्या कोकणकन्या बसमधून पंढरपूरकडे रवाना झाले. त्यावेळी त्यांना शुभेच्छा देऊन हे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पंचायत समिती माजी उपसभापती तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख सिद्धेश उर्फ भाई परब, शिरोडा उपसरपंच तथा शिवसेना शाखाप्रमुख चंदन हाडकी, ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश उर्फ बड्या परब, कृष्णा आचरेकर, वैभव मांजरेकर, समीर आचरेकर, आनंद गोडकर, गौरव राऊत, भाऊ गोडकर, अरुण शेटये, सोनू गावडे, राजा परब, बाबा मसुरकर, मकरंद शेटये, संदीप राऊत, वारकरी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








