LIVE UPDATES

सैनिक वसतिगृहात शौर्य दिन उत्साहात

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 29, 2026 16:15 PM
views 36  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सावंतवाडी : सैनिक वसतिगृह सावंतवाडी या ठिकाणी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग मार्फत शौर्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. २९ सप्टेंबर हा दिवस भारतीय लष्कराच्या अतुलनीय पराक्रमाची आठवण म्हणून 'शौर्य दिन' साजरा केला जातो.

हा दिवस भारतीय जवानांचे शौर्य, त्याग आणि अदम्य पराक्रमाचा सन्मान करण्यासाठी देशभरात आणि मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. सावंतवाडी येथे सैनिक वसतिगृहात हा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ऑपरेशन सिंदूर मधील योद्धा सुभेदार मेजर संजय सावंत उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत देशप्रेम जागृत केलं.  यावेळी सहायक जिल्हा सैनिक अधिकारी, लक्ष्मण कोळी,  अण्णासाहेब माने, विनोद सावंत, श्री. मिसाळ तसेच वीर माता, वीर पत्नी, सैनिक पत्नीसह शौर्य पदक धारक भारतीय सैनिक उपस्थित होते.