LIVE UPDATES

सावंतवाडीत मध्यरात्री पकडला भलामोठा अजगर

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 29, 2026 17:02 PM
views 40  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सावंतवाडी : कळसुलकर हायस्कूलच्या शेजारी काल मध्यरात्री भलामोठा अजगर पकडण्यात आला. वनविभागाच्या मदतीने व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या पुढाकारातून हा अजगर पकडण्यात यश आले. 

काल मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. यावेळी वनविभागाचे जलद कृती दल व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानाच्या सदस्यांकडून त्याला पकडण्यात आले. यावेळी शुभम कळसुलकर, गोपाळ सावंत, रूपा मुद्राळे आदींसह येथील रहिवासी उपस्थित होते. येथील स्थानिकांनी यासाठी आभार व्यक्त केले.