LIVE UPDATES

ज्ञानेश नाईकच्या शिक्षणासाठी सामाजिक बांधिलकीकडून आर्थिक मदत

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 29, 2026 16:55 PM
views 30  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सावंतवाडी : शहरातील ज्ञानेश गणेश नाईक हा विद्यार्थी नीट परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी पुणे - चिंचवड येथे शिक्षणासाठी जात आहे. अतिशय हुशार व होतकरू असून त्याला शिक्षणासाठी आर्थिक सहकार्य म्हणून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून मदत देण्यात आली आहे. 

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे व शरदिनी बागवे यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर वैयक्तिक स्वरूपात 10 हजार रुपये तर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्याकडून 10  हजार रुपये त्याच्या शिक्षणासाठी धनादेशद्वारे मदत करुन त्याला त्याला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, सचिव समीरा खलील, रूपा मुद्राळे, हेलन निबरे, समीता बागवे, शरदिनी बागवे, रवी जाधव, प्रतिभा दवळी आदी उपस्थित होते.