LIVE UPDATES

शशिकांत आपटे यांचे निधन

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 22, 2026 03:38 PM
views 83  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

कुडाळ : तालुक्यातील आवळेगाव-टेंबवाडी येथील रहिवासी शशिकांत जनार्दन आपटे (वय ८०) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. अत्यंत मनमिळाऊ व सहकार्य करणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती.

त्यांनी ३५ वर्षे परिवहन खात्यामध्ये उत्तम सेवा बजावली. एम्. आय्. टी. एम्. कॉलेज सुकळवाड येथील कर्मचारी प्रसाद आपटे यांचे ते वडील होत.आजरा तालुका शेती व्यावसायिक प्रसाद जोशी, काँग्रेसचे कुडाळ तालुका अध्यक्ष विजय प्रभू व पुणे येथील मिशिलिन टायर्स कंपनी मध्ये कार्यरत असलेले तुषार जोग यांचे ते सासरे होत. तसेच रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध बिल्डिंग मटेरियल सप्लायर डी. के. जोशी ॲण्ड सन्स कंपनीचे मालक रमेश जोशी व गोपाळ जोशी यांचे ते मामा होते.