
सावंतवाडी : येथे झालेल्या जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत शांतीनिकेतन इंग्लिश स्कूल, सावंतवाडीची विद्यार्थिनी कु. यज्ञा गजानन तळवणेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.या दमदार कामगिरीमुळे तिची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याबद्दल शांतीनिकेतन स्कूल आणि क्रीडा विभागाकडून तिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.












