
कसाल : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बंधारे बांधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केल्यानंतर कसाल वझरेवाडी मित्र मंडळाच्या वतीने ग्रामस्थांनी एकजुटीचे दर्शन घडवले आहे.वझरेवाडी मांडाचे घर नजीक ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून बंधारा बांधून पाणी अडवण्यास मदत केली. वजरेवाडीतील मित्र परिवाराने एकत्र येत बंधारे घालण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार प्रत्यक्ष कृतीतून हा बंधारा उभारला.या उपक्रमामुळे परिसरातील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार असून इतर गावांसाठीही हा आदर्श ठरला आहे.











