LIVE UPDATES

ओटवणे गावाला निधी कमी पडू देणार नाही : संजू परब

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: August 16, 2026 18:35 PM
views 71  views

सावंतवाडी : ओटवणे गावाच्या विकासासाठी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून गेल्या १५ लाखो रुपयांचा निधी देण्यात आलेला असून यापुढेही शिवसेनेच्या माध्यमातून ओटवणे गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू परब यांनी ओटवणे वासियांना दिली.

शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू परब यांनी नुकतीच ओटवणे गावाला भेट दिली. यावेळी गावप्रमुख रवींद्र गावकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सरपंच आत्माराम गावकर, पंचायत समिती सदस्य उत्कर्षा गावकर, माजी उपसरपंच बाबाजी गावकर, शिवसेनेचे विभागप्रमुख उमेश गावकर, सामाजिक कार्यकर्ते बबलू गावकर, युवा शिवसेना तालुका प्रमुख क्लेटस फर्नांडिस, निगुडे माजी सरपंच झेवीयर फर्नांडिस, भाजपा शक्ती केंद्रप्रमुख प्रशांत बुराण, महेश गावकर, भक्ती पनासे, तुषार गावकर, उदित गावकर आदी उपस्थित होते. यावेळी संजू परब यांनी ओटवणे रवळनाथ मंदिराला भेट देत दर्शन घेतले. यावेळी धार्मिक पर्यटन निधीमधून आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून रवळनाथ मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी निधी दिलेला असून यापुढेही मधील परिसराच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.