LIVE UPDATES

सामाजिक कार्यकर्ते सुशिल आमुणेकर यांचं उपोषण स्थगित

पालकमंत्री नितेश राणेंचं आश्वासन
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: August 16, 2026 18:29 PM
views 61  views

सावंतवाडी : पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेले आश्वासन आणि आरोग्य उपसंचालक यांचे  मार्फत शासनाला प्रस्ताव देण्याचे लेखी आश्वासन जिल्हा शल्यचिकित्सक सिंधुदुर्ग कार्यालयाने दिल्याने सामाजिक कार्यकर्ते सुशिल आमुणेकर यांनी सुरु केलेले उपोषण स्थगित केले.

15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी  सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.आमुणेकर यांनी  मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, ट्रामा केअर युनिट आणि रिक्त वैद्यकीय अधिकारी पद भरतीच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण सुरु केले होते. पालकमंत्री श्री.राणे, आमदार दीपक केसरकर यांनी यावेळी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्ते श्री.आमुणेकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी श्री.राणे म्हणाले, उपोषणकर्ते यांची मागणी योग्य आहे. त्यावर कार्यवाही करण्यासाठी लवकरच बैठक बोलावली जाईल.

तसेच जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे डॉ. चिपळूणकर यांनीही श्री.आमुणेकर यांच्याशी चर्चा केली. रिक्त वैद्यकीय अधिकारी पद भरतीची राज्यस्तरावर 1440 पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली. अर्ज मागविले आहेत. त्यातून प्राधान्याने सिंधुदुर्गला वैद्यकीय अधिकारी मिळावेत अशी मागणी केली आहे. प्रधान सचिव आरोग्य यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मागणी केली आहे. 108 रुग्णवाहिका आणि ट्रामा केअर युनिट संक्षमतेने कार्यान्वित करावे, अशी मागणी आहे. याबाबत आरोग्य उपसंचालक कोल्हापूर यांचे मार्फत मागणी करण्यात येईल. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्या जागेचा मुद्दा न्यायप्रविष्ठ आहे. 20 ऑगस्टला याबाबत सुनावणी आहे. हा जागेचा प्रश्न सुटल्यावर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने उपोषणकर्ते यांच्या मागण्यांचा अनुषंगाने पाठपुरावा करु अशी हमी दिली. तसेच उपसंचालक यांना दिलेले पत्र, पालकमंत्री यांचे आश्वासन या सर्वांनचा विचार करुन श्री.आमुणेकर यांनी तूर्त उपोषण स्थगित केले.