
सावंतवाडी : भाजपची सत्ता नगरपरिषदेवर असताना उपोषणाला बसाव लागलं ही दुर्दैवाची गोष्ट आहे. ४० वर्ष नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली काम केलं असून मुख्याधिकारी चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत. पालकमंत्र्यांनी सांगून देखील कार्यवाही न केल्याने उपोषण छेडल्याचे विशेष कार्यकारी अधिकारी संतोष गांवस यांनी सांगितले.
ते म्हणाले, मयत होऊन एक वर्ष झालेलं नसताना आईच्या नावे नगरपरिषदेकडून इमारत धोकादायक असल्याबाबत नोटीस बजावली गेली. त्यामुळे असिसमेंटवर भोगवटदार आईच्या नावाजागी माझ्या नावाची नोंद व्हावी अशी मागणी केली होती. पालकमंत्र्यांच्या समक्ष मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा झाली होता.
मात्र, आता प्रशासनाकडून कारण दिली जात असून नगरपरिषदेन चुकीच्या कामाला परवानगी दिल्याने झालेल्या अपघातानंतर तीचा मृत्यू झाला. याबाबत मुख्याधिकारी कोणत्याही प्रकारची दखल घ्यायला तयार नाहीत. पोलीस ठाण्यात जाण्याचे सल्ले देत आहेत. मात्र, दुसरीकडे मयत व्यक्तीच्या नावाने नोटीसा बजावत आहेत. त्यामुळे नोंद करण्याबाबतचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे श्री. गांवस यांनी स्पष्ट केले. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी उपोषणस्थळी भेट देत चर्चा करत पालकमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. तसेच मुख्याधिकारी समक्ष येऊन भेटतील असे सांगितले.










