
सावंतवाडी : नीट पेपरफुटी आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सावंतवाडीत शांतता मोर्चा निघणार असून आम्ही भारतीय व विद्यार्थ्यांच्या मार्फत याचे आयोजन करण्यात आले आहे.
सावंतवाडीतील सुजाण नागरिक, विद्यार्थी मिळून पेपरफुटीच्या निषेधार्थ व केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या शांततापूर्ण उपोषणावर केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याचा निषेध करण्यासाठी उद्या सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत कळसुलकर हायस्कूल तें गांधीचौक पर्यंत शांतता मोर्चा काढणार आहोत. या शांतता पूर्ण मोर्चामध्ये विध्यार्थी समाजातील संवेदनशील नागरिक उपस्थित राहतील. हे आंदोलन शांततापूर्ण असेल व कायदा सुव्यवस्था अबाधित राहील याची दक्षता घेऊ अशी माहिती आम्ही भारतीयकडून दिली आहे











