LIVE UPDATES

विठ्ठल मंदिरात १६ ते २३ जुलैदरम्यान विठ्ठल रखुमाई हरिनाम वीणा सप्ताह

Edited by: कोकणसाद LIVE वृतसेवा
Published on: July 15, 2026 21:18 PM
views 21  views

सावंतवाडी : सावंतवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही १६ जुलै ते २३ जुलै २०२६ या कालावधीत विठ्ठल रखुमाई हरिनाम वीणा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाच्या निमित्ताने दररोज सायंकाळी महिला मंडळाचे भजन, वारकरी भजन तसेच विविध भजनी मंडळे आणि संगीत विद्यालयांचे सांगीतिक कार्यक्रम होणार आहेत.

सप्ताहात सावंतवाडीसह बांदा, भेडसगाव (वेंगुर्ले) आदी ठिकाणांतील भजनी मंडळांचा सहभाग राहणार असून, अभिवन संगीत विद्यालय ‘भक्तिरंग’, सद्गुरू संगीत विद्यालय यांचेही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.यानंतर २५ जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त पहाटे श्रींची काकड आरती, महापूजा तसेच विविध मान्यवर कीर्तनकारांची कीर्तने आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये ह.भ.प. विलासभूषण गवंडे, ह.भ.प. मधुश्री सावंत तसेच ह.भ.प. श्रद्धेश्वर गवंडे यांची कीर्तने होणार असून, सकाळी पालखी सोहळाही पार पडणार आहे.२३ जुलै रोजी हरिनाम वीणा सप्ताहाची सांगता महाप्रसादाने होणार असून, या धार्मिक उत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विठ्ठल मंदिर स्थानिक देवस्थान समिती व विठ्ठल मंदिर उत्सव समिती, सावंतवाडी यांनी केले आहे.