LIVE UPDATES

जामसंडेत कॅरमपट्टू विकास कुळकर्णींचा सत्कार

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 15, 2026 20:21 PM
views 17  views

देवगड : सावंतवाडी येथे नुकत्याच पार पडलेल्या नगराध्यक्ष चषक जिल्हास्तरीय गट व खुल्या गट कॅरम स्पर्धेतील खुल्या गटात विजेता ठरलेला विकास कुळकर्णी (देवगड) याचा देवगड कॅरम असोसिएशनतर्फे नुकताच जामसंडे कॅरम क्लब येथे सत्कार करण्यात आला. तसेच देवगड तालुका रॅकिंग खेळाडूंना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. 

यावेळी देवगड कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश प्रभू सचिव अनिकेत पेडणेकर, संदीप राणे, हेमंत गाडगीळ, सागर दळी, अमोल पाटकर, प्रकाश जाधव, गोपाळ देवगडकर, संकेत कदम, योगेश कोळी, दिपेश कुळकर्णी, संकेत चव्हाण, मेषक राणे, दिनेश जामसंडेकर, सुशिल रुमडे, प्रदीप पडेलकर आदी उपस्थित होते. हेमंत गाडगीळ, संदीप राणे, प्रकाश जाधव, प्रकाश प्रभू यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व आभार अजित टाककर यांनी मानले.